वर्धा :- वर्धा जिल्हातील विधानसभा निवडणुकीचे वारे शहरी भागासोबतच ग्रामीण भागात सुद्धा वाहू लागली आहे त्यामुळे प्रत्येक पक्ष आपली बाजू मजबूत करण्याकरता आजी-माजी व सद्यस्थिती असलेले मंत्री हे शहरी भागासोबतच ग्रामीण भागात जाऊन निवडणुकीच्या आढावा घेत आहे .कार्यकर्त्यांच्या व पदाधिकारी बैठका घेऊन आपली बाजू वरचट कशाप्रकारे राहील याबाबत कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे काम करीत आहे.
अल्लीपूर येथील विठ्ठल मंदिर देवस्थान मध्ये विधानसभा निवडणूक बाबत भाजप पक्षातील कार्यकर्त्यांची आढावा बैठक कॅबिनेट मंत्री प्रल्हाद पटेल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यावेळेस वर्धा जिल्ह्याची माजी खासदार सुरेश वाघमारे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नाना ढगे मिलिंद भेंडे वामन खोडे नितीन चंदनखेडे अण्णाजी कातोरे व असंख्य प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थित बैठक घेण्यात आली .
- प्रतिनिधी, सतीश काळे, वर्धा