रामटेक :- रामटेक पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रामटेक तुमसर बायपास मार्गांवरील नागारा तलावात अंदाजे 30 ते 32 वर्षीय अज्ञात युवकाचा मृतदेह दि. 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास आढळून आले असून अजूनही मृतकाची ओळख पटलेली नसून ओळख पटल्यास रामटेक पोलिसांना कळविण्याची विनंती रामटेक पोलिसांकडून करण्यात आली आहे.
माहितीनुसार,रामटेक तुमसर बायपास मार्गांवरील नागारा तलावाकडे काल रात्री 9 वाजताच्या सुमारास एक अनोळखी तरुण जातांना परिसरातील काही मुलांना दिसले. याची माहिती रामटेक पोलिसांना देण्यात आली. रात्री रामटेक पोलिसांनी तलाव परिसर गाठले मात्र अंधार असल्याने कुणीच आढळून आले नाही. मात्र सकाळच्या सुमारास नागारा तलावत त्याच अनोळखी युवकाचे मृतदेह आढळून आले.रामटेक पोलिसांनी व वाईल्ड चॅलेंजर टीमने मृतदेह तलावाच्या बाहेर काढून शवविच्छेदन केंद्र रामटेक येथे घेऊन गेले. अधिक तपास रामटेक पोलीस करीत असून सदर अनोळखी युवकाची ओळख पटल्यास रामटेक पोलिसांना कळविण्याची विनंती रामटेक पोलिसांनी केली आहे.
- पंकज चौधरी , रामटेक नागपूर.