भंडारा :- तुमसर-मोहाडी विधानसभा मतदार संघात आमदार म्हणून केलेल्या कामाची पावती प्रचारा दरम्यान मतदारांशी होत असलेल्या भेटीतून मिळत आहे. जनतेचा आशीर्वाद व लोकांचा कल दिवसेंदिवस वाढतच असून विधानसभेचे नेतृत्व करण्याची संधी देईल, असा विश्वास चरण वाघमारे यांनी प्रचार सभेत बोलून दाखविला. जात-पात आणि धर्मभेद विसरून एकत्र येऊन तुमसर-मोहाडी विधानसभा मतदार संघाच्या विकासा करीता हातभार लावण्यास मदत करा. याअगोदर मी पाच वर्षे या मतदार संघाच्या विकासासाठी काम केले ते तुम्ही जवळुन बघीतले आहे. पुढेही तुम्ही दिलेला विश्वास जपत राहील, असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार चरण वाघमारे यांनी केले. महाविकास आघाडी सत्तेवर आली तर लाडकी बहीण योजना बंद होईल, प्रवास सवलत बंद होईल असे बिंबवण्याचा प्रयत्न प्रसिद्धी माध्यमाच्या वतीने केल्या जात आहे. मात्र त्यावर जनतेनी विश्वास ठेवून नये. महा- विकास आघाडीची सत्ता आली तर महिलांना ३ हजार रुपये दिल्या जाईल सोबतच शेतकऱ्यांचे तीन लाखापर्यंतचे पीक कर्ज सुद्धा माफ केले जाईल. भाववाढीच्या माध्यमातून भावांचे असो अथवा शेतकऱ्यांचे खिसे कापल्या जाणार नाही असेही चरण वाघमारे यावेळी म्हणाले.
जो उमेदवार विकास करतो तो उमेदवार अमिश देऊन मते विकत घेत नाही, ज्याने विकास केला नाही तो मते विकत घेण्याचा प्रयत्न करीत आहे.
माजी आमदार चरण वाघमारे यांच्या पाठीशी मतदारांच्या प्रेमाचे असलेले बळ हेच खरी जनशक्ती विरुद्ध धनसक्ती ची लढाई आहे. गोर गरिबांचे केलेले कामातून लोकांचे प्रचंड समर्थन त्यांना मिळत आहे. याच समर्थनाच्या जोरावर विधानसभेत जाण्याचा मार्ग यशस्वी होतील, असा विश्वास माजी आमदार चरण वाघमारे यांनी व्यक्त केला.
- नितीन लिल्हारे तुमसर मोहाडी प्रतिनिधी