यवतमाळ :- पालकमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्याहस्ते दारव्हा तालुक्यातील विविध विकास कामे, बांधकामे, भक्त निवास, डिजिटल क्लासरुम, मोकळ्या जागेचे सौदर्यीकरण अशा कामांचे भूमिपूजन, लोकार्पण झाले. समाजातील सर्वच घटकांना दिलासा देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचे याप्रसंगी पालकमंत्री म्हणाले.
यावेळी पालकमंत्र्यांसह माजी जिप सभापती श्रीधर मोहोड, दारव्हा नपचे मुख्याधिकारी विठ्ठल केदारे उपस्थित होते. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत करण्यात आलेल्या निंभी ते पिंपरी मार्गाचे लोकार्पण पालकमंत्र्यांनी केले. दारव्हा शहरातील नगर परिषद प्राथमिक शाळा दोनच्या पहिल्या मजल्याचे बांधकाम, नगर परिषद मराठी शाळा दोनमध्ये डिजिटल क्लासरूम तसेच इंटेरीयल वर्क, प्रभाग क्रमांक दहा मधील मोकळ्या जागेचे सौदर्यीकरण कामाचे लोकार्पण करण्यात आले. टिळकवाडी ते दिग्रस रोडपर्यंतचे बांधकाम, चावडी हद्दीमध्ये व्यापारी संकूल बांधकामाचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले.दारव्हा तालुक्यातीलच प्राथमिक आरोग्य केंद्र, तळेगाव येथील जुनी मुख्य ईमारत निर्लेखन करुन त्याच जागेवर नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मुख्य ईमारत बांधकाम व अधिकारी, कर्मचारी निवासस्थान बांधकामाचे लोकार्पण, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत प्रमुख जिल्हा मार्ग माहुली ते इरथळ रस्ता भूमिपूजन करण्यात आले.
- महान्यूज 7 कारिता अकरम दिवान प्रतिनिधि यवतमाळ