हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात नव्याने सुरु होत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला विश्वरत्न भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी आंबेडकरवादी युवकांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले . डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अथक परिश्रमाने ,अस्पृश्यतेचे चटके सहन करून एकूण ३२ डिग्री प्राप्त केल्या होत्या .त्यांना सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून सुद्धा ओळखले जाते . असे थोर महापुरुष ज्यांच्या संघर्षाचा त्यांच्या कर्तृत्वाचा पाया शिक्षण आहे अशा महामानवाचे नाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास द्यावे जेणेकरून इथे शिकणारे विद्यार्थी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा घेऊन समाजाची सेवा करतील. अशी मागणी यावेळी सर्व समाजबांधवांनी केली .यावेळी योगेश नरवाडे मुनीर पठाण अँड आनंद खिल्लारे निखिल कवाने लखन खंदारे राहुल पुंडगे, विकी भालेराव, प्रितम सरकटे, अक्षय इंगोले, बंडू नरवाडे, राजरत्न बगाटे, विशाल दुधमल सचिन तपासे आनंद धुळे मयूर नरवाडे अभिषेक करंजे तसेच हिंगोली शहरातील आंबेडकरवादी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.