Home » एकच वादा नरेंद्र पहाडे दादा या घोषणांनी भंडारा पवनी विधानसभा मतदारसंघ दुमदुमला

एकच वादा नरेंद्र पहाडे दादा या घोषणांनी भंडारा पवनी विधानसभा मतदारसंघ दुमदुमला

उमेदवार नरेंद्र पहाडे यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे असे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा प्रचार

by Maha News 7
0 comment
Narendra pahade

भंडारा :- भंडारा पवनी विधानसभा मतदार संघातील शेतकरी, शेतमजूर, कामगार, भूमीहीन, सुशिक्षित बेरोजगार, गोरगरीब, शोषित पिडीत जनतेचे तरुण तडफदार, झुंजार, दमदार,युवा नेतृत्व , लोकप्रिय उमेदवार नरेंद्र पहाडे हे मतदार नागरिकांच्या डोअर टू डोअर जाऊन मतदार बंधू भगिनींना पद वंदन करून पदाधिकारी, कार्यकर्त्यां समवेत जोरदार प्रचार करीत असून भंडारा पवनी विधानसभा मतदार संघात जनतेचे लोकप्रिय उमेदवार नरेंद्र पहाडे यांची तुतारी वाजू लागली असून एकच वादा नरेंद्र पहाडे दादा असा आवाज दुमदुमू लागला आहे.त्यामुळे भंडारा पवनी विधानसभा मतदारसंघात जनतेला नरेंद्र दादा पहाडे (Narendra Pahade) आमदार हवा नवा असे चित्र निर्माण झाल्याचे दिसून येत आहे त्यामुळे मतदारांनी कोणाच्याही दबावाला प्रलोभनाला बळी न पडता नरेंद्र पहाडे यांच्या चूनाव चिन्ह तुतारी समोरील बटण दाबून मतदान रुपी आशीर्वाद देऊन प्रचंड बहुमताने निवडून द्यावे असे आवाहन पदाधिकारी व कार्यकर्ते करीत आहेत.

भंडारा पवनी विधानसभा मतदार संघ निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीला रंग चढू लागला आहे. जनतेचा उमेदवार नरेंद्र पहाडे यांच्यासाठी विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते जीवाचे रान करून जनतेच्या मना मनातील लोकप्रिय उमेदवार नरेंद्र पहाडे यांचा प्रचार करण्यात व्यस्त असून प्रचाराला शेतकरी, शेतमजूर,प्रकल्प ग्रस्त शेतकरी, कामगार,भूमीहीन, सुशिक्षित बेरोजगार, गोरगरीब,शोषित पिडीत जनता,ज्येष्ठ नागरिक, आबाल वृद्ध मतदार बंधू भगिनींचा आपला हक्काचा उमेदवार म्हणून नरेंद्र पहाडे जोरदार प्रतिसाद मिळत आहे.वाढत्या प्रतिसादामुळे कार्यकर्त्यांसह मतदार नागरिकन्स नरेंद्र पहाडे यांना जनतेचा आमदार बनविण्याचा एकच ध्यास लागला आहे.

जनतेचे उमेदवार नरेंद्र पहाडे हे साधी राहणी उच्च विचार या विचाराने प्रेरित होऊन कोणत्याही मोठ्या पदावर नसतांना पदाधिकारी व कार्यकर्त्यां विश्वासात घेऊन सर्व सामान्य जनतेची कामे करण्यास पुढाकार घेत असतात ,त्यांच्या समस्या सोडवून दिलासा देण्याचा मनापासून प्रयत्न करतात जनतेच्या सूख दुःखात सहभागी होत असतात ,सामाजिक ,सांस्कृतिक, धार्मिक,शैक्षणिक कार्यात सहभागी होत असल्याने त्यांनी प्रत्येक समाजात सामाजिक सलोखा निर्माण केला आहे.ही नरेंद्र पहाडे यांची जमेची बाजू आहे. त्यांनी समाज कार्याच्या माध्यमातून जनतेच्या मनावर आपल्या परोपकारी, परमार्थ शील सेवाभावी कार्याचा अल्पावधीतच ठसा उमटवला आहे. भंडारा पवनी विधानसभा मतदार संघातील सर्वसामान्य नागरिक तसेच सुजाण मतदार बंधू भगिनींनी जनतेचे लोकप्रिय उमेदवार नरेंद्र पहाडे यांचे नाव आपल्या हृदयात कोरले असून आता एकच दादा नरेंद्र पहाडे दादा असा आवाज गूंजू लागला आहे.मतदार बंधूभगिनींनी जनतेचे उमेदवार नरेंद्र पहाडे यांच्या चूनाव चिन्ह तुतारी समोरील बटण दाबून मतदान रुपी आशीर्वाद देऊन प्रचंड बहुमताने विजयी करावे असे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचार करतांना कळकळीचे आवाहन करीत आहेत.

  • रिपोर्टर : क्रिष्णा बावनकुळे भंडारा महाराष्ट्र

You may also like