नागपुर :- नागपुरातील अनिल देशमुखांच्या घराबाहेर शरद पवार (Sharad Pawar) गटाला डीवचणारे होर्डिंग्ज लावण्यात आले आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत पवार (Prashant Pawar) यांनी हे बॅनर लावले आहेत.राज्याच्या विधानसभा (Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024) निकालानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. महाराष्ट्राच्या जनतेनं महायुतीच्या (Mahayuti) बाजून कौल दिला. मतदार राजानं अगदी भरभरून मतांचं दान महायुतीच्या पदरात टाकलं. तर राज्याच्या सत्तेची चावी महायुतीला मिळाली असून मुख्यमंत्री पदी कोण विराजमान होणार? हे ही लवकरच स्पष्ट होणार आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला दारुण पराभवाला समोर जावे लागले असून अनेक दिग्गज नेत्यांना हार पत्करावी लागली आहे. अशातच आता या जय-पराजयाच्या खेळात नागपुरात होर्डिंग वॉर रंगल्याचे दिसून आले आहे. ‘तुतारीच्या नवनियुक्त 10 आमदारांचेही अजित दादा हेच वाली’ असा आशयाचे बॅनर माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या नागपुरातील घरासमोर लागले आहे. यात राष्ट्रवादी शरद पवार गटाला होर्डिंग्जच्या माध्यमातून लक्ष्य करण्यात आले आहे. सध्या या बॅनरची एकच चर्चा रंगली आहे.