भंडारा : महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ आणि राज्य अभियंता संघटना भंडारा यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठे धरणे आंदोलन सुरु आहे. कंत्राटदारांनी महाराष्ट्र सरकारवर (Maharashtra Govt) निवडणुकांच्या तोंडावर केवळ घोषणाबाजी केल्याचा आरोप केला आहे. लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना अशा अनेक योजनांच्या नावाखाली शासनाच्या तिजोरीवर भार वाढवला जात आहे, परंतु कंत्राटदारांचे 40 हजार कोटी रुपयांचे बिले थांबवली आहेत. राज्यातील सुशिक्षित बेरोजगार आणि सहकारी संस्थांच्या देयकांसाठी आंदोलन तीव्र केले असून, निवडणुका जिंकण्यासाठी केलेल्या फक्त घोषणा थांबवण्याची मागणी केली आहे.
ही बातमी पण वाचा : मविआ ने नेता बोल रहे है “हम आपके है कौन” : देवेंद्र फडणवीस