Home » अमोल कोल्हे व नितेश कराळे यांच्या सभेला उसळली जनतेची सुनामी

अमोल कोल्हे व नितेश कराळे यांच्या सभेला उसळली जनतेची सुनामी

प्रदीप नाईकांच्या प्रचारार्थ मारले छटकार

by Maha News 7
0 comment
Amil Kolhe Jan Sabha

नांदेड :- काल दिनांक 15 ऑक्टोंबर रोजी किनवट माहूर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रदीप नाईक यांच्या प्रचारार्थ खासदार अमोल कोल्हे व नितेश कराळे आणि भीम टायगर सेनेचे शेळके यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती सभेच्या आधी दिनकर दहिफळे व गजानन मुंडे यांनी त्यांच्या समर्थकांच्या काढलेल्या रॅलीने सर्वांचेच लक्ष वेधले. माहूर ते इस्लापूर पर्यंतच्या मागील पंधरा वर्षात नाईकांनी विविध पदावर बसवलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी आपापले शक्तिप्रदर्शन दाखवत हजारो कार्यकर्त्यांना व जनतेला एकत्र केलेले दिसून आले. सुरुवातीलाच प्रदीप नाईक बोलताना त्यांना अगदी गहिवरून आले. आपल्या लाडक्या नाईक साहेबांच्या डोळ्यातलं पाणी बघून जनतेचाही डोळ्यातही पाणी उतरलं. त्यानंतर शेळकेंनी सभा गाजवूनच सोडली अंगावर काटा येईल अशा भाषेत आणि अशा शब्दात त्यांनी सभेला संबोधित केलं. अमोल कोल्हे बोलताना म्हणाले की तुम्ही फक्त प्रदीप नाईकांना आमदार करा त्यांना मंत्री बनवण्याचे आश्वासन मी देतो ही सभा प्रचाराची तर वाटतच नाही इतके लोक एखाद्या मंत्राच्या ही सभेला नसतात असे उदगार ही त्यांनी काढले. कराळे सरांच्या भाषणाने तर महायुतीचे सगळे कपडेच फाडले त्यांच्या बोलण्याच्या शैलीने सभामंडप खदखदून हसत होता. सभेच्या यशस्वी नियोजनासाठी समाधान जाधव, अमजद पठाण वाईकर, प्रकाश राठोड, बालाजी बामणे, राहुल नाईक, पंडित राठोड, ज्ञानेश्वर दहिफळे, यांच्यासह युवा नेते कपिल नाईकांनी भरपूर मेहनत घेतली.

  • महान्यूज7 साठी लक्ष्मीकांत मुंडे, किनवट नांदेड

You may also like