नंदूरबार :- दिवाळी सणानिमित्त नागरिक प्रवास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बसला प्राधान्य देत असतात मात्र चोपडा हून सुरत कडे जाणारी बस चालक हे मध प्राशन करून गाडी चालवत असल्याची माहिती खांडबारा येथील सरपंचांना मिळाली होती या अनुषंगाने खांडबारा नजीक बस थांबवून ड्रायव्हरला जाब विचारण्यासाठी थांबवले मात्र बस चालक दारू पिऊन गाडी चालवत असल्याचे समोर आले यानंतर बस चालकाविरुद्ध विसरवाडी पोलीस ठाण्यात ड्रंक अँड ड्राईव्हच्या गुन्हा दाखल झाला आहे. राज्यभरात हीट अँड रनचे केसेसची संख्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे तसेच सुरत डेपोचे बस चालक दारू पिऊन बस चालवत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहे बस मधील प्रवाशांपैकी जबाबदार व्यक्तीने वेळेवर खबर दिल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.