रामटेक :- 14 ऑक्टोबर रोजी रामटेक-तुमसर मार्गावरील बोरी शिवारातून वाहणाऱ्या पेंच नहरात आंघोळीसाठी गेलेल्या चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास उघडकीस आली होती. त्याच नहरात एक 32 वर्षीय शेतमजूर नहरात वाहून गेल्याची घटना घडली आहे. रामटेक पोलिसांनी तक्रार नोंदवून शोध सुरू केला आहे.
हितेश सुखलाल पटले, वय ३२ वर्ष असे मृतकाचे नाव असून लोहारा जिल्हा.बालाघाट येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या ४ महिन्यांपासून तो रामटेक तालुक्यातील बोरी (महादुला) येथे राहत होता.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला मृतक त्याच्या मावशीच्या घरी राहत होता. तर गेल्या एक महिन्यापासून तो बोरी (महादुला) येथील पराग झाडे यांच्याकडे शेतमजूर म्हणून काम करत होता. शुक्रवारी दुपारपर्यंत त्यांनी शेतात औषध फवारणी केली. व जेवण करून दुपारी साडेतीनच्या सुमारास तो नहराच्या काठावर गेला असतांना तो घसरला आणि नहरात पडला. पाण्याच्या प्रवाहात वाहत असल्याचे पाहून परिसरातील उपस्थित लोकांनी आरडाओरड केले मात्र तोपर्यंत हितेश दूरपर्यंत वाहून गेला होता. घटनेची माहिती रामटेक पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळ गाठून शोध सुरू केला. मात्र अंधार झाल्यामुळे नहरात जाळी टाकून शोधकार्य थांबवण्यात आले.दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास मृतदेह पोलिसांना प्राप्त झाले आहे.
- पंकज चौधरी, रामटेक नागपूर