Home » ठाणेदार यांना पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते प्रशस्ति पत्र देऊन सन्मान

ठाणेदार यांना पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते प्रशस्ति पत्र देऊन सन्मान

निवडणुकीमध्ये मोठी सांभाळली जबाबदारी, उत्कृष्ट बंदोबस्त

by admin
0 comment
Anurag Jain

वर्धा :- वर्धा जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक बंदोबस्त अनुषंगाने परिसरामध्ये अल्लीपूर गावामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये मोठी जबाबदारी सांभाळली व उत्कृष्ट बंदोबस्त लावून कामगिरी केल्याबद्दल पोलीस अधीक्षक अनुराग जैन (Anurag Jain) यांच्यामार्फत अल्लीपूर येथील ठाणेदार प्रफुल डाहूले यांना प्रशिस्त पत्र देऊन सन्मान करण्यात आला.  देवळी पुलगाव येथील उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल चव्हाण तथा उप पोलीस अधीक्षक सागर कवडे यांच्या उपस्थितीत प्रशस्त पत्र देऊन अल्लीपूर येथील ठाणेदार प्रफुल डाहूले (Praful Dahule) यांचा सन्मान करण्यात आला .

  • प्रतिनिधी, सतीश काळे, वर्धा

You may also like