वर्धा :- जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय वर्धा, बाल कल्याण समिती, वर्धा, बाल न्याय मंडळ, वर्धा जिल्हा बाल संरक्षण कक्ष , चाईल्ड हेल्प लाईन वर्धा, रेल्वे सुरक्षा बल, वर्धा, मार्फत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्य बाल सप्ताह चे आयोजन करण्यात आलेले होते, बाल हक्क सप्ताहाचा शुभारंभ रेल्वे स्टेशन वर्धा येथे करण्यात आलेला होता यावेळी मा. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी वर्धा यांचे मार्फत कार्यक्रमाचे उदघाट्न करण्यात आलेले होते तसेच बालकांच्या सुरक्षितेकरिता परिसवाद आयोजित करण्यात आलेले होता, सप्ताहमध्ये शाळा महाविद्यालय तसेच वस्त्या मध्ये जाऊन बालकांन सोबत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते यामध्ये परिसवाद, मनोरंजनात्मक व बालकांच्या सुप्त गुणांना वाव मिळावे या उद्देशाने विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते उदघाटन कार्यक्रमामध्ये मा. श्रीमती मनीषा कुरसंगे उपमुख्य कार्यकारी
अधिकारी जि.प. वर्धा तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, वर्धा
श्रीमती ऍड स्मिता बढिये अध्यक्ष बाल कल्याण समिती,वर्धा
श्रीमती अलका भुगुल सदस्य बाल न्याय मंडळ,वर्धा
आर पी एफ -इंस्पेक्टर सी एल कनोजिया, वर्धा, सब इंस्पेक्टर ए के शर्मा, सेवाग्राम, सब इंस्पेक्टर एस डी डिगोले, आरक्षक सूरज ढाकणे, श्रीमती वैशाली मिस्कीन संरक्षण अधिकारी ,श्री महेश कामडी संरक्षण अधिकारी,श्रीमती सुनंदा हिरुडकर विधी तथा संरक्षण अधिकारी,श्री आशिष मोडक प्रकल्प समन्वयक चाईल्ड हेल्प लाईन १०९८ वर्धा,श्रीमती जयश्री निवल चाईल्ड हेल्प लाईन वर्धा, शीतल घोडराव चाईल्ड हेल्प लाईन वर्धा, श्री. प्रदीप वनकर चाईल्ड हेल्प लाईन वर्धा, अन्सार अली चाईल्ड हेल्प लाईन वर्धा, श्री मनोज चौधरी ,श्री पियुष आगलावे, निखिल पाटील,आकांशा उगेमुगे यांची परिसंवादत् सहभाग घेऊन बालकांच्या काळजी व संरक्षणाच्या उद्देशाने चर्चा करण्यात आली होती.
सदर सप्ताहचे समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन श्री छाया बालगृह येथे घेण्यात आला यावेळी बालकांसोबत विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते , गीत गायन, नृत्य अशा विविध स्पर्धा घेण्यात आलेल्या होत्या यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. स्मिता बढिये अध्यक्ष बाल कल्याण समिती, वर्धा, तसेच प्रमुख उपस्थिती मा. ममता बालपांडे याची होती, मंचावर चाईल्ड हेल्प लाईनचे प्रकल्प समन्वयक आशिष मोडक, बालगृहाचे अधीक्षक स्पप्नील मानकर, श्रीमती वैशाली मिस्किन या उपस्थित होत्या.
यावेळी बालकांच्या सुरक्षिते बाबत ममता बालपांडे सद्स्य बाल कल्याण समिती वर्धा यांनी माहिती दिली तर श्रीमती स्मिता बढिये यांनी बालकांच्या शिक्षणासोबत व्यावसायिक शिक्षणाबाबत या विषयावर मार्गदर्शन केले, कार्यक्रमाचे संचालन वैशाली मिस्कीन यांनी केले तर आभार आशिष मोडक यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेकारिता चाईल्ड हेल्प लाईनच्या माधुरी शंभरकर, जयश्री निवल, ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट च्या आकांशा उगेमुगे, उष:काल बालगृहाच्या दीपाली परमार,सोनाली भोयर,अश्विनी सोनुलकर,सुषमा भोयर, रुपाली फाले,माधुरी थूल, सुनंदा पाहुणे, आदेश राठोड,सागर घाटे, इशांत भगत यांनी प्रयत्न केले.
- प्रतिनिधी, सतीश काळे, वर्धा