- क्षितिज ठाकुरांनी केला संताप व्यक्त
पालघर :- नालासोपारा मतदारसंघात भाजपा कडून मतदारांना पैसे वाटण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नालासोपारा पूर्वेकडील विवांता हॉटेल येथे पैसे वाटले जात होते. हा प्रकार समोर आल्यांनतर नालासोपाऱ्याचे आमदार आणि बहुजन विकास आघाडीचे (Bahujan Vikas Aghadi) उमेदवार क्षितिज ठाकूर यांनी त्वरीत धाव घेत निवडणूक अधिकारी आणि पोलिसांना या घटनेची माहिती दिली आहे. मतदानासाठी मोठ्या प्रमाणावर भाजपाकडून पैशाचा वापर होत आणि हे दुर्दैवी आहे असे म्हणत क्षितिज ठाकुरांनी (Kshitij Thakur) संताप व्यक्त केला आहे.
- गोवर्धन बिहाडे वसई पालघर