पालघर :- वसई तालुक्यातील नालासोपारा स्टेशन ते थेट भिवंडी तालुक्याच्या सीमेवरील सा्यवान गावा पर्यंत चे क्षेत्र पुर्वी वाडा विधानसभा मतदार संघात समाविष्ट होते. भाजप चे विष्णू सवराम येथील आमदार आणि दोन टर्म कॅबिनेट मंत्री, पालक मंत्री पदावर होते. माजी राज्यपाल राम भाऊ नाईक वसई पालघर भागाचे 5 टर्म खासदार होते. केंद्रात 10 वर्ष मंत्री होते.विवेक भाऊ पंडित 5 वर्ष आमदार होते.पालघर जिल्ह्याशी निगडीत सर्व विधान परिषद जागावर बहुजन विकास आघाडी सोडून भाजपा व अन्य पक्षाचे आमदार होते आणि आहेत.
दुर्दैवाने त्यांच्या दायित्व बद्दल प्रश्न उपस्थित होत नाहीत कदाचित आ. हितेंद्र ठाकूर हेच विकास कामं करतात आणि करू शकतील असा ग्रह असावा अस वक्तव्य बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजीव पाटील यांनी केल.
- प्रतिनिधी, गोवर्धन बिहाडे वसई, पालघर