वर्धा :- वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार (Sharad Pawar) हे दौऱ्यावर होते यावेळेस त्यांनी हिंगणघाट येथीलसुधीर कोठारी यांची भेट घेतली. शरद पवारांचे जुने साथीदार पण विश्वासात न घेतल्याने कोठारी यांनी पक्षाचा राजीनामा दिला. शरद पवार सभे आधी थेट नाराज असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीला गेल्याने हिंगणघाट येथील बंड क्षमनार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .सुधीर कोठारी हिंगणघाट येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मेंबर होते मात्र त्यांना विश्वासात न घेता तिकीट दिल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाचा राजीनामा दिला आहे .
- प्रतिनिधी, सतीश काळे, वर्धा