रामटेक :- नागपूर जिल्ह्यातील रामटेक पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या बोरडा सराखा येथील प्रियसी तरुणीला तिच्या प्रियकर व सोबत असलेल्या मित्रांनी ठार केल्याची घटना घडली असून घटनेतील 4 आरोपीपैकी 2 आरोपीना अटक करण्यात आली असून मुख्य 2 आरोपी भारतीय सैन्य दलात कार्यरत असल्याने अजूनपर्यंत अटक करण्यात आली नसल्याने रामटेक पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
प्राप्त माहितीनुसार, बोरडा येथील रहिवासी कुमारी यशोदा उर्फ भारती गोमा नारनवरे वय 22 वर्ष. हिचे डोंगरताल ता. रामटेक येथील रहिवासी सचिन घरत याच्यासोबत प्रेमसंबंध होते. घरच्यांना माहिती न होता दोघांनीही 25 जानेवारी 2021 रोजी कोर्टमध्ये लग्न लावले.सचिन हा भारतीय सैन्य दलात कार्यरत असल्याने त्याने यशोदा हिला तिच्या आईच्या घरी राहायला सांगितले होते. 2023 मध्ये सचिन सुट्टीवर आला असल्याने यशोदा त्याच्या घरी राहायला गेली होती. मात्र सचिन ड्युटीवर गेला असतांना सचिनचे आई, वडील व काका यांनी यशोदाला घराबाहेर काढले. त्यानंतर ती आपल्या आईच्या गावी बोरडा येथे राहत होती. यावेळी तिचे सचिनसोबत बोलण बंद होते. मात्र एका महिन्यानंतर पुन्हा दोघांचं बोलण सुरु झाले.
दि.1 सप्टेंबर 2024 रोजी सचिनने यशोदाला रात्री 11. 30 वाजता कॉल आला व शेतात भेटायला बोलावलं व तिथेच तिचा गळा आवळून खून केला. व गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या स्कर्पिओ वाहनात टाकून तिला रात्रीच्या सुमारास मध्यप्रदेश गाठून तेथील नर्मदा नदीच्या पात्रात फेकून दिले. सचिनला दुसऱ्या मुलीशी लग्न करायचे असून यशोदा सोडचिट्ठी देण्यास नकार देत असल्याने तिचा गळा आवळून खून केला असा 2 आरोपीना विचारपूस केलेल्या चौकशीत समोर आले आहे.
पोलिसांनी यशोदाच्या हरविल्याच्या तक्रारीवरून मध्यप्रदेश जबलपूर येथील नर्मदा नदीच्या पात्रात शोध घेतला असता बेळाघाट (मध्यप्रदेश) येथे 7 सप्टेंबर 2024 रोजी कुजलेल्या अवस्थेत एक प्रेत मिळून आले.
याआधारे भारतीय सैन्य दलात कार्यरत असणारे मुख्य आरोपी सचिन घरत व नरेंद्र दोडके व अन्य राहुल चौके, भुनेश्वर गजबे यांच्यावर भारतीय दंड संहिता अधिनियम 103(1), 140(1), 3(5), 238 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील 4 आरोपीपैकी दोघांना अटक करण्यात आले असून एकाला सेंट्रल जैल नागपूर येथे तर एकाला अल्पयीन असल्याने बाल सुधार गृहात पाठविण्यात आले असून भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले 2 मुख्य आरोपीना आणायला 2 पथक जम्मू-काश्मीर व राजस्थान येथे रवाना झाले असल्याची माहिती रामटेक पोलीस ठाण्याचे ठाणेदार आसाराम शेटे यांनी दिली तर घटनेत वापरण्यात आलेली स्कॉर्पिओ वाहन जप्त करण्यात आले असून घटनेचा अधिक तपास रामटेक पोलीस करीत आहे.तर मृतकाला योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्न करू असे माध्यमांशी बोलतांना उदयसिंग उर्फ गज्जु यादव यांनी सांगितले.
- पंकज चौधरी , रामटेक नागपूर.