वर्धा :-वर्धा जिल्ह्यातील भूगाव येथील स्टील कंपनी काल रात्री ला अचानक स्पोट झाल्याची माहिती समोर आली आहे .
त्यामध्ये अंदाजे 23 कामगार अचानक झालेल्या स्पोट मुळे गंभीर जखमी झाली आहे .
कंपनीमध्ये कूलिंग प्रोसेस सुरू असताना अचानक स्पोट झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे .
मागील काही महिन्यापूर्वी सुद्धा याच कंपनीत स्फोट झाला होता कंपनीचा ढिसाळ कारभार उघड्यावर आला आहे त्यामुळे वारंवार या कंपनीमध्ये स्पोर्ट होत आहे .
या कंपनीत कामगारांना कोणत्याही प्रकारचा सोयी सुविधा कंपनीमार्फत देण्यात येत नाही .
याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे
तर काही कामगार स्पोट झाल्या मुळे भाजल्या गेले असून गंभीर आहे .
जखमी झालेल्या कामगारांना सावंगी येथील रुग्णालयामध्ये नेण्यात आले असून उपचार सुरू आहे .काही रुग्णांना नागपूर येथे नेले आहे .
सावंगी येथील येथील रुग्णालयामध्ये वर्धेचे राजेश बकाने भेट देऊन जखमी झालेल्या रुग्नाशी व त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधला आहे .
प्रतिनिधी
सतीश काळे
वर्धा
- व्हिज्यूअल