Home » गुरुदक्षणिच्या नावाखाली प्रहार सोबत गद्दारी करणा-यांची हकालपट्टी: बिपिन चौधरी

गुरुदक्षणिच्या नावाखाली प्रहार सोबत गद्दारी करणा-यांची हकालपट्टी: बिपिन चौधरी

प्राचार्य विदर्भ कार्याध्यक्ष बल्लू जवंजाळ यांनी नुकतेच दिला आदेश

by Maha News 7
0 comment
Bipin Chaudhary

यवतमाळ :- जिल्ह्यातील प्रहार चे जिल्हाध्यक्ष नितीन मिर्जापुरे यांना पक्षातून नुकतेच काढण्यात आले आहे याबाबतचा आदेश प्राचार्य विदर्भ कार्याध्यक्ष बल्लू जवंजाळ यांनी नुकतेच दिले आहेत. नितीन मिर्जापुरे सध्या काँग्रेसच्या नेत्यांसोबत सतत दिसत असल्याच्या तक्रारी प्रहारच्या कार्याध्यक्ष्यांकडे प्राप्त झाल्या होत्या, याबाबत त्यांनी खात्री केली आणि खात्रीनंतरच ही कारवाई केली आहे गेल्या काही दिवसापासून नितीन मिर्जापुरे हे काँग्रेसच्या नेत्यांसोबत राहत असल्याने त्याचा परिणाम प्रकारच्या राजकीय पटलावर होऊ शकतो असा ठपकाही ठेवण्यात आला आहे त्यामुळे ही कारवाई केल्याचे जवंजाळ यांनी सांगितले. नितीन यांच्या हकालपट्‌टीबाबत प्रहारचे जिल्हा पदाधिकारी बिपिन चौधरी यांचेशी चर्चा केली असता ते म्हणाले की, गुरुदक्षणिच्या नावाखाली प्रहार सोबत गद्दारी करणा-यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षाशी गद्दारी करणा-यांचे विचार प्रहारच्या विचाराच्या विरुद्ध चालले होते. प्रहारचे नाव वापरुन त्यांनी रेती व्यवसायात खुप माया जमा केल्याचेही आरोप मिर्झापुरे यांचेवर झाले होते. एका बाईच्या प्रकरणामध्येही त्यांचे नाव आल्याने पक्षाची प्रतिमा मलीन झाली होती, तसेच प्रहारच्या उमेदवाराला समर्थन न देता अन्य उमेदारचे काम करीत असल्याने पक्ष नेतृत्वाने त्यांनी हकालपटटी केली असल्याचे यावेळी चौधरी यांनी सांगीतले.

  • प्रतिनिधि मकसूद अली

You may also like