अमरावती :- आगामी निवडणूक विधानसभा निवडणूक 2024 अनुषंगाने दर्यापूर मतदारसंघासाठी एकूण 39 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यामध्ये अचलपूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा उद्योजक अरुण वानखडे यांना प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी अरुण वानखडे यांना पक्षाची उमेदवारी जाहीर केली. अरुण वानखडे यांनी दर्यापूर मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करुन दर्यापूर मतदार संघात नवीन उद्योग,बंद सूतगिरणी, बंद कारखाने, अंजनगाव सुर्जी येथील अंबा देवी साखर कारखाना, शकुंतला रेल्वे चालू करुन रोजगार निर्मिती कशी होईल तसेच दर्यापूर मतदार संघाचा रखडलेला विकास पूर्ण करण्याचा निर्धार करुन संपूर्ण मतदार संघ पिंजून काढण्याचा निर्णय घेतला असून मतदार संघातील मतदारांना भेटी देण्याचा सपाटा चालू केला आहे त्या अनुषंगाने दुकान टू दुकान, डोअर टू डोअर भेटी देत असून त्यांना लोकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे.खास करुन मुस्लिम समाजाचे अरुण वानखेडे यांना भरघोस प्रतिसाद व समर्थन मिळत आहे. तसेच मतदार संघ राखीव असल्याने एस सी समाजाचे मतदार मोठ्या संख्येने त्यांना प्रतिसाद देत आहे आणि आमदार बच्चू कडू यांच्यामुळे पाटलांचा मोठा आधार त्यांना मिळणार आहे , वाढता प्रतिसाद आणि समर्थन यामुळे त्यांचा विजय निश्चित होईल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे…
अरुण वानखेडे यांनाच का निवडून द्यावे यावर त्यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यावर त्यांनी मी राजकारणात नवखा नाही, मी अचलपूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद भूषविले आहे, त्यामुळे विकास कसा करावा तो अनुभव मला आहे तसेच मी यशस्वी उद्योजक असून रोजगार निर्मिती कशी होईल, आणि मतदार संघात उद्योग निर्मिती कशी होईल यांचा दांडगा अनुभव आहे. आणि वाढता प्रतिसाद पाहता चौरंगी लढतीत माझाच विजय होईल हे निश्चित आहे.
- रिपोर्ट जावेद शाह अंजनगाव सुर्जी