Home » वंचित बहुजन आघाडीच्या प्रचार कार्यालयाचे भव्य उद्घाटन

वंचित बहुजन आघाडीच्या प्रचार कार्यालयाचे भव्य उद्घाटन

मान्यवरांचा उत्साही प्रतिसाद

by Maha News 7
0 comment
madhawrao wedh

यवतमाळ :- वंचित बहुजन आघाडीचे पुसद विधानसभा क्षेत्राचे अधिकृत उमेदवार माधवराव वैद्य यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या थाटात व जल्लोषात पार पडले. माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक चौकात, माळाणी हॉस्पिटलसमोर उभारलेल्या या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्याचे नेते, तालुक्यातील पदाधिकारी, आणि विविध समाजातील नामवंत व्यक्ती व बौद्ध, आदिवासी, मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींनी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या ठिकाणी एक वेगळाच उत्साह अनुभवायला मिळाला. समारंभास आलेले कार्यकर्ते आणि समर्थक यांची संख्या पाहता संपूर्ण परिसर गर्दीने भरून गेला होता. उमेदवाराबद्दलचा च्या एकेक कार्यकर्ता उत्साहात घोषणा देत, हातात झेंडे घेऊन आपल्या नेत्याबद्दलचे प्रेम दर्शवत होता. त्यांच्या चेहऱ्यावर विजयाची जिद्द दिसून येत होती.

उमेदवार माधवराव वैद्य यांनी आपल्या भाषणात वंचितांच्या हक्कांसाठी अखंड लढा देण्याचा संकल्प व्यक्त केला. त्यांच्या बोलण्यातून एक आत्मीयता आणि समाजाच्या प्रति समर्पण भाव झळकत होता, जे प्रत्येक श्रोत्याच्या मनाला भिडले. या उद्घाटनाने पुसदमधील राजकीय वातावरण तापले असून, आगामी निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा दमदार प्रवेश होणार, असा संदेश देण्यात आला.

  • मोहम्मद हनिफ पुसद यवतमाळ (Yavatmal)

ही बातमी पण वाचा : प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार अरुण वानखडे यांना लोकांचा भरघोस प्रतिसाद

 

You may also like