Home » शक्ती प्रदर्शन करीत अखेर मूळकांनीही भरला उमेदवारी अर्ज

शक्ती प्रदर्शन करीत अखेर मूळकांनीही भरला उमेदवारी अर्ज

माजी मंत्री सुनील केदार यांचे उपस्थितीत अर्ज दाखिल

by Maha News 7
0 comment
Rajendra Mulak
  • राजेंद्र मूळकांची नाराजी जाणार जड
  • महाविकास आघाडीत मोठी बंडखोरी बरबटे यांना पडणार भारी
  • माजी मंत्री उमेदवार राजेंद्र मुळक बाईट

रामटेक :- उमेदवारी अर्ज भरायच्या दिवशीच महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) शहर व ग्रामीण भागात बंडखोरीची लागण झाली. यात अनेक दिवसापासून अनेकांच्या समस्या जनता दरबाराच्या माध्यमातून निराकरण करणारे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी मंत्री राजेंद्र मुळक (Rajendra Mulak) यांनी आपले शक्ती प्रदर्शन करीत अखेर शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री सुनील केदार, खासदार श्यामकुमार बर्वे सह उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकडे , उपाध्यक्ष कुंदा राऊत,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे, मुळक यांची अर्धांगिनी, जिल्हा परिषद सदस्य शांता कुमरे, दुधराम सव्वालाखे सह मोठ्या संख्येने समर्थक उपस्थित होते. दुसरीकडे दिग्गज काँग्रेस नेते चंद्रपाल चौकसे सह अनेकांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरला.महाविकास आघाडीत दिग्गज नेत्यांची मोठी बंडखोरी महाविकास आघाडीचे उमेदवार बरबटे यांची डोकेदुखी वाढवेल . मुळक यांची उमेदवारी भारी पडणार असल्याने विशाल बरबटे कोणती चाणक्य नीती अवलंबतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्वपध्दतीने प्रयत्न केल्यानंतरही रामटेक काँग्रेसला न सोडल्याने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक , यांनी शेवटी रामटेकमधून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेत उमेदवारी अर्ज अखेर दाखल केल्याने ही निवडणूक एकंदरीत चुरशीची होणार आहे.

काँग्रेसचे नेते व इच्छुक रात्रीपर्यंत पक्षाच्या आदेशाची प्रतीक्षा करीत होते. अखेर पर्यंत प्रतीक्षा केली जात असल्याचे सांगण्यात येते. शेवटचा दिवस असल्याने बंडखोरी करणाऱ्यांची संख्या वाढली लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून, अनेक दिग्गज नेत्यांचे पदरी निराशा आल्याने नाराज नेत्यांनी उमेदवारी अर्ज भरून पक्षाशी बंड पुकारले आहे. काँग्रेस नेते राजेंद्र मुळक यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत अर्ज दाखल केला. ही निवडणूक एकंदरीत चुरशीची होणार आहे.कोण कोणाची पतंग काटते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण बघायास मिळाले.

  • ब्युरो रिपोर्ट राकेश मर्जिवे, रामटेक नागपूर

You may also like