नंदुरबार :- अक्कलकुवा धडगाव विधान सभेसाठी शेवटचा दिवस असल्याने आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून जिल्हा परिषद सदस्य रतन पाडवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.महायुती मध्ये येथील उमेदवारी विधान परिषदेचे आ. आमश्या पाडवी यांना देण्यात आल्याने महायुतीच्या पदाधिकारी मध्ये नाराजीचा सूर उमटला होता .अक्कलकुवा धडगाव मतदार संघाची जागा राष्ट्रवादी ला देण्यात यावी अशी मागणी अजित पवार गटाकडून करण्यात आली होती परंतु ही जागा शिवसेनेला सुटल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे रतन पाडवी यांनी आज 1 अपक्ष तर 1 राष्ट्रवादी तर्फे अर्ज दाखल करत उमेदवारी दाखल केली आहे.आमश्या पाडवी हे विधान परिषदेचे आमदार आहेत तरी देखील त्यांनाच उमेदवारी देण्यात आली हे न समजण्या पलीकडे आहे .तसेच अक्कलकुवा धडगाव मतदार संघात बऱ्याच समस्या आहेत जे आजपर्यंत सुटू शक्यल्या नाहीत जी प च्या माध्यमातून त्या समस्या सोडवण्याच्या प्रयत्न केला असून बऱ्याच समस्या आहेत ज्या सोडवायच्या आहेत त्यासाठी उमेदवारी मागीतली होती परंतु उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष उमेदवारी करत असल्याचे जिल्हा परिषद सदस्य रतन पाडवी यांनी सांगितले आहे.एकंदरीत अक्कलकुवा धडगाव विधान सभेच्या उमेदवारी साठी महायुती मधील सर्वच घटक पक्षाने उमेदवारी केल्याने मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची श्यक्यता आहे परंतु माघारी अती चित्र स्पष्ट होऊन लढत कशी होईल हे निश्चित होईल.