Home » विद्यमान आमदार व अपक्ष उमेदवार सचिन नाईकांचे जोरदार शक्ती प्रदर्शन

विद्यमान आमदार व अपक्ष उमेदवार सचिन नाईकांचे जोरदार शक्ती प्रदर्शन

किनवट येथे नामांकन अर्ज दाखल

by Maha News 7
0 comment
Sachin Naik

माहूर :- दिनांक 28 ऑक्टोबर रोजी किनवट माहूर विधानसभेचे विद्यमान आमदार भीमरावजी केराम (Bhimraoji Keram) यांनी  हजारो समर्थकांसह जोरदार शक्ती प्रदर्शन करत मतदारसंघात स्वतःचे असलेले वर्चस्व व लोकप्रियताच दाखवून दिली।   विद्यमान आमदार व एक अपक्ष उमेदवार यांच्या समर्थकांमुळे किनवट नगरीला जणू यात्रेचे स्वरूप आले होते. कारण किनवट माहूर विधानसभेत पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जाणारा व आजी-माजींना आव्हान देणारा एक अपक्ष युवा उमेदवारही मैदानात उतरलाय. सचिन नाईक (Sachin Naik) गेल्या काही वर्षातच जनसंपर्क वाढवून युवकांच्या लोकप्रियतेस उतरलेत  त्यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांच्या शक्ती प्रदर्शनातही हजारो समर्थकांचा जणू महासागराच लोटला होता. विशेष म्हणजे मिरवणुकीत सर्वच जाती-धर्माचे लोक आणि सर्वच रंगाचे झेंडे दिसत होते त्यामुळे सचिन नाईकांची अपक्ष उमेदवारी ही आजी-माजींना धक्का देणार की काय अशी चर्चा जनतेत होताना दिसून येत आहे.

  • महान्यूज 7 साठी लक्ष्मीकांत मुंडे किनवट माहूर

ही बातमी पण वाचा : दक्षिण -पश्चिम से फडणवीस बचा पाएंगे अपनी कुर्सी? या फिर प्रफ्फुल पाटिल दिखाएंगे कुछ कमाल !

You may also like