Home » विरार येथे संजय राऊत यांच्या “हेप्सीचे वादळ” या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम

विरार येथे संजय राऊत यांच्या “हेप्सीचे वादळ” या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम

लेखकाने लिव्हर ट्रान्सप्लांट बाबतीतले स्वानुभव लिहिलेले

by Maha News 7
0 comment

वसई :- दिनांक २६ ऑक्टोबर रोजी विरार येथे संजय राऊत यांच्या “हेप्सीचे वादळ” या पुस्तकाचा प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला. हया कार्यक्रमाला वसई विरार महानगरपालिकेच्या माजी महापौर श्रीमती प्रविणाताई ठाकूर, फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशनचे अध्यक्ष श्री. पुरुषोत्तम पवार तसेच बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव श्री.अजीव पाटील, आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष श्री प्रशांत राऊत उपस्थित होते.

“हेप्सीचे वादळ” या पुस्तकात लेखकाने लिव्हर ट्रान्सप्लांट बाबतीतले स्वानुभव लिहिलेले असून, हे पुस्तक यकृत प्रत्यारोपण करण्यास सांगितलेल्या रुग्णांसाठी खूप उपयुक्त माहिती देणार आहे. या कार्यक्रमात क्रांती राऊत- चुरी हिने आपल्या पित्याला यकृतदाना बद्दल माजी महापौर श्रीमती प्रवीणताई ठाकूर यांनी आपल्या भाषणातून तिचा गौरव केला. फेडरेशनचे अध्यक्ष श्री पुरुषोत्तम पवार यांनी अवयव त्यांना संदर्भात अतिशय उपयुक्त माहिती आपल्या भाषणातून दिली. बविआचे संघटक सचिव श्री. अजीव पाटील यांनी आपल्या भाषणातून, पुस्तकाचे विवेचन करून कोरोना काळातील आठवणी जागवल्या.

संजय राऊत लिखित “हेप्सीचे वादळ” हे पुस्तक न्यू मुद्रा बुक डेपो विष्णू प्रतिभा हॉलमागे, विरार, तसेच मॅजेस्टिक बुक डेपो, आयडियल बुक डेपो आणि ॲमेझॉन वर उपलब्ध होईल.

  • गोवर्धन बिहाडे वसई पालघर

You may also like