Home » शेतीच्या वादातून सख्या भावांची एकमेकांना मारहाण; दोन्ही जखमी

शेतीच्या वादातून सख्या भावांची एकमेकांना मारहाण; दोन्ही जखमी

विविध कलमानुसार गुन्हा दाखल, तपास सुरु

by Maha News 7
0 comment
beat each other

वर्धा अल्लिपुर :- पिंपळगाव शेत शिवारात शेतीच्या वादातून चक्क सख्या भावांची एकमेकांना मारहाण केली यामध्ये दोन्ही भाऊ गंभीर जखमी झाले. प्राप्त माहितीनुसार अल्लीपूर येथिल रहिवासी देवराव बालाजी घूसे व कवडू बालाजी घुसे हे दोघे सख्खे भाऊ आहे.या दोघांना ज्ञानेश्वर बालाजी घुसे व त्याचा मुलगा आदित्य घुसे या दोघांनी पिंपळगाव येथील शेतामध्ये शेती संबंधी वाद झाला असता दोघांनी काठीने व गोट्याने मारून गंभीर जखमी केली आहे.याबाबत अल्लीपूर पोलीस स्टेशन मध्ये देवराव बालाजी घुसे व कवडू बालाजी घुसे यांनी ज्ञानेश्वर बालाजी घुसे व आदित्य घुसे यांच्या विरुद्ध अल्लीपूर पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. अल्लीपूर पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास अल्लीपूर पोलीस करीत आहे.

ही बातमी पण वाचा : रोडरोलरचा धक्का लागून पती जखमी, पत्नी ठार

You may also like