Home » महाविकास आघाडीचे उमेदवार बबलू चौधरी यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज

महाविकास आघाडीचे उमेदवार बबलू चौधरी यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज

बदनापूर विधानसभा मतदार संघात चुरशीशी लढत

by Maha News 7
0 comment
Mahavikas Aghadi Bablu Chaudhary

जालना :- आज दिनांक 25 ऑक्टोबर 2024 वार शुक्रवार रोजी दुपारी दोन वाजता जालना जिल्ह्यात बदनापूर तहसील (Badnapur Tehsil) कार्यालय येथे महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार खंडू चौधरी यांनी बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज बदनापूर तहसील कार्यालय येथे दाखल केला आहे यावेळी मोठा शक्ती प्रदर्शन करत सर्वात प्रथम बदनापूर येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना शरद पवार राष्ट्रवादी गटाचे नेते रोहित पवार व खासदार डॉक्टर कल्याण काळे माझ्या आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मार्गदर्शन केले व त्यानंतर शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन तहसील कार्यालय येथे मोठा शक्ती प्रदर्शन करत बबलू चौधरी यांनी आपल्या महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना सोबत घेऊन हा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या वेळी कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला सुद्धा मिळाला आहे, बबलू चौधरी व भारतीय जनता पार्टीचे बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार नारायण कुचे यांच्यामध्ये ही प्रमुख लढत होणार आहे आता या लढतीमध्ये मतदार राजा कोणाचे पारडे मतदान देऊन जड करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले.

ही बातमी पण वाचा : नवनीत राणा यांनी भाजपचे उमेदवार प्रवीण तायडे यांची मुलाकात थांबवली

You may also like