Home » राळेगाव मतदार संघात भाजपचे डॉ. प्राध्यापक अशोक उईके यांचे मोठे शक्ती प्रदर्शन

राळेगाव मतदार संघात भाजपचे डॉ. प्राध्यापक अशोक उईके यांचे मोठे शक्ती प्रदर्शन

तिसऱ्यांदा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला

by Maha News 7
0 comment
Ashok Uike

बाभुळगाव :- राज्यात विधानसभा निवडणुकीचा (Vidhan Sabha Election) बिगूल वाजल्यानंतर, साधारणपणे सर्वच राजकीय पक्षांनी बहुतांश मतदार संघांतील आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. यानंतर अनेक ठिकाणी विविध पक्षांचे उमेदवार आपापला उमेदवारी अर्ज दाखल करताना दिसत आहेत. यातच आज राळेगाव मतदार संघात भाजपचे डॉ, प्राध्यापक अशोक उईके (Ashok Uike) यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करून दिनांक २४ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता च्या सुमारास तिसऱ्यांदा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सर्वप्रथम राळेगाव शहरातील भाऊसाहेब कोल्हे सभागृहात महायुतीच्या नेते व कार्यकर्त्यांना डॉ अशोक उईके यांनी संबोधित केले त्या नंतर राळेगाव शहरातून ढोल ताशांच्या गजरात पारंपारिक नृत्य सादर करीत भव्य राहिली काढण्यात आली. यावेळी रॅलीमध्ये भावा साठी लाडक्या बहिणीने मोठ्या संख्येने लावलेली हजेरी लक्ष वेधून घेणारी होती. ही रॅली राळेगाव शहरातील मुख्य चौक फिरून उपविभागीय कार्यालयात पोहोचली , तिथे डॉ अशोक उईके यांनी आपला नामांकन अर्ज दाखल केला व राळेगाव विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी विशाल खत्री यांनी नामांकन अर्ज स्वीकारला . अर्ज दाखल करताना डॉ. अशोक उईके यांच्यासोबत मध्यप्रदेश राज्याचे मंत्री प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस, राळेगाव विधानसभा प्रमुख सतीश मानलवार उपस्थित होते.

  • प्रतिनिधी, करामत अली बाभुळगाव

ही बातमी पण वाचा : सातव्यांदा उमेदवारी, रेकॉर्ड पार विजयाची तयारी !

You may also like