Home » पालकमंत्र्यांनी विकास न केल्याचा एकेकाळच्या निकटवर्तीयांचा आरोप

पालकमंत्र्यांनी विकास न केल्याचा एकेकाळच्या निकटवर्तीयांचा आरोप

नेरचे माजी नगराध्यक्ष पवन जयस्वाल यांची प्रतिक्रिया 

by Maha News 7
0 comment
Pawan Jaiswal

यवतमाळ:-  यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी दारव्हा, दिग्रस, नेर या मतदारसंघात कोणत्याही प्रकारचा विकास केला नाही. असा आरोप  एकेकाळी पालकमंत्री राठोड यांचे निकटवर्तीय राहिलेले नेरचे माजी नगराध्यक्ष पवन जयस्वाल यांनी केला आहे. संजय राठोड शिंदे सेनेसोबत असून जयस्वाल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटासोबत आहेत. पालकमंत्री राठोड तीन वेळा मंत्री राहीले असून, शेतकऱ्यांचे प्रश्न निकाली काढू शकले नाही. शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पांदण रस्ते नाही. बेरोजगारांच्या हाताला काम नाही. मतदारसंघात एकही उद्योग सुरु करू शकले नाही. एमआयडीसीचा फलक केवळ शोभेचा ठरत आहे. पारधी समाजाच्यासमस्या निकाली निघाल्या नाही, अशी टीका माजी नगराध्यक्ष जयस्वाल यांनी केली आहे मात्र या संदर्भात पालकमंत्री संजय राठोड यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी आपल्या विधानसभा क्षेत्रातच नव्हे तर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारांसाठी शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी अनेक काम केले आहे जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात विविध कामे आणले आहेत त्याची सुद्धा कामे चालू आहे मात्र विरोधक हे नेहमी विरोध करत असतात त्यांच्या विरोधाला आम्ही घाबरत नाही असे मत पालकमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केले आहे सदैव आम्ही जनतेच्या पाठीशी राहणारे आहोत त्यामुळे जनतेचे आम्ही सर्वप्रथम काम करू अशी सुद्धा त्यांनी माहिती दिली.

  • यवतमाळ शहर, प्रतिनिधी मकसूद अली

You may also like