Home » जालना रेलवे स्थानकावरील भुयारी मार्ग पाण्याखाली 

जालना रेलवे स्थानकावरील भुयारी मार्ग पाण्याखाली 

नागरिकांना काढावा लागत आहे पाण्यातून मार्ग

by Maha News 7
0 comment
Subway at Jalna railway station under water
  • स्थानिक नागरिकांची जिल्हाधिकारी यांच्या विरोधात रोष

जालना :- मागील दोन दिवसापासून जालना शहरासह संपूर्ण जिल्हा घरात व जालना शहरात जोरदार परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे आणि त्याच मुळे जालना येथील रेल्वस्थानकावर रेल्वे विभागाने नुकताच बनवलेला भुयारी मार्ग हा पाण्याखाली गेला आहे. यामुळे जमुना नगर, सरस्वती कॉलनी, रमाबाई नगर, आनंद नगर, जैय नगर, आदर्श नगर, विद्युत कॉलेणी, तसेच रेल्वे कॉटर या भागातील हजारो नागरिक या भुयारी मार्गातून रोज रहदारी करत होते. मात्र या परतीच्या पावसाने जो या भुयारी मार्गात पाणी साचले आहे व पूर आला आहे. यामुळे रात्रीपासून या मार्गावरील वाहतूक बंद झाली असून पूर्णतः रस्ता बंद झाला आहे. या सर्व अडीअडचणीकडे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी लक्ष घालावे व या ब्रिजची झालेली दुरावस्था पाहून सुरळीत रस्ता या रहिवाशांना करून द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिनकर घेवंदे यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे. कारण या मार्गावरून रोज हजारो नागरिक आपले दैनंदिन कामकाजाचे व हजारो विद्यार्थी शाळेत कॉलेज शिक्षणासाठी जातात मात्र या पाण्यामुळे पूर्णतः वाहतूक ठप्प झाल्यामुळे नागरिकांमध्ये जिल्हा प्रशासन रेल्वे विभागाच्या विरोधात रोष व्यक्त केला जात आहे.

  • जालना महा 7 न्यूज प्रतिनिधी योगेश काकफळे

You may also like