Home » ज्यांनी नळ व वीज कापन्याची भीती घातली यावेळी जनता धडा शिकवणार – विजय पाटील

ज्यांनी नळ व वीज कापन्याची भीती घातली यावेळी जनता धडा शिकवणार – विजय पाटील

by Maha News 7
0 comment
Congress Vijay Patil
  • वसईत बीएलए प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न!

पालघर :- अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार काल गुरुवारी (दि. १७) अण्णासाहेब वर्तक सभागृह, काँग्रेस भवन वसई येथे वसई विरार शहर जिल्हा काँग्रेसचे बीएलए प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे कोकण विभाग प्रभारी जोजो थॉमस व प्रदेश सरचिटणीस विजय पाटील यांच्या मार्गदर्शनात व जिल्हाध्यक्ष ओनिल आल्मेडा यांच्या नेतृत्वाखाली या प्रशिक्षण शिबराचे आयोजन केले होते. या शिबिरासाठी महाराष्ट्र काँग्रेसच्या वॉर रूमकडून दोन प्रशिक्षक निश्चय व विशाल यांना पाठवण्यात आले होते. त्यांनी उपस्थित पदाधिकारी व बीएलए यांना उत्तम प्रकारे प्रशिक्षण देताना त्यातील बारकावे सांगितले. यावेळी वसई विरार शहर जिल्हा कमिटीचे पदाधिकारी, ब्लॉक काँग्रेस, सर्व सेल व विभागाचे, महिला आघाडी, युवा सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण सभागृह खचाखच भरला होता.

बीएलए म्हणजे बूथ लेव्हल एजंट यांची निवडणुकांदरम्यान किती महत्त्वाची भूमिका असते, याचे महत्त्व सांगण्यात आले. कार्यकर्त्यांनी आपापल्या विभागातील मतदारयादी तपासणे, यादीचा अभ्यास व त्याची पुन्हा वर्गवारी करणे तथा अंदाजे २५० ते ३०० कुटुंबांना तीन वेळा संपर्क साधने, त्यांना मतदान करण्याचे महत्त्व पटवून देणे याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. एक द्वार तीन बार अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी काँग्रेसच्या समर्थनातले, विरोधातले व जे दोन्ही बाजूकडे नाहीत, अशांना संपर्क साधून त्यांना मतदानविषयी समजावून सांगणे ही भूमिका योग्य प्रकारे पार पाडण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले. राज्यात लाडकी बहीण व लाडका भाऊ योजना राबवून अशा लोकांची दिशाभूल करून राज्याला लोबडणाऱ्या घोटाळेबाज सरकारची लक्तरे वेशीवर टाळण्यात आली. कार्यकर्त्यांना त्याबाबत जनजागृती करण्याचे आवाहन केले. सरकार अशा योजना आणून बहिणींना व भावांना मूर्ख समजण्याचे पाप करत असून जनता त्यांना यावेळी धडा शिकवणार आहे असे त्यांनी सांगितले. एलईडी स्क्रीन व लॅपटॉप द्वारे मार्गदर्शन करण्यात आले. समाज माध्यमांद्वारे जिल्हा काँग्रेस व प्रदेश काँग्रेस यांच्यात समन्वय साधण्यात येणार आहे. यानंतर पोलिंग एजंट व मतमोजणी एजंट यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

ही बातमी पण वाचा : महामंडळावर नियुक्ती तरीही भाजपा नेते माजी आमदार रामराव वडकुते नाराज?

You may also like