जालना :- आज दिनांक 16 ऑक्टोंबर रोजी जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी विधानसभा निवडणूक (Vidhan Sabha Election) पूर्व पत्रकार परिषद घेतली आहे, व या मध्ये त्यांनी योग्य त्या सूचना पत्रकार परिषद घेत दिली आहे. जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी स्पष्ट केलं की 85 वर्ष वय असलेल्या वृद्धांना तसेच अपंगांना घरून मतदान करण्याची मुभा असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसेच जिल्ह्याच्या सर्व सीमावर चेक पोस्ट लावण्यात आलेली असून आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे तसेच अवैध दारू, अमली पदार्थ यावर विशेष लक्ष राहणार असल्याची माहिती सुद्धा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी दिली आहे.
ही बातमी पण वाचा : विद्यार्थिनींनी आत्मसंरक्षणाबाबत सजग राहावे -ठाकरे, जिल्हा दामिनी प्रमुख वर्धा