चांदूरबाजार :- आपल्या विनोदी कलेने संपूर्ण महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करणारी महाराष्ट्राची हास्य जत्रा उद्या १८ ऑक्टोबर रोजी अचलपूर नगरीत येत आहे या कार्यक्रमात चित्रपट अभिनेत्री सई ताम्हणकर आणि हास्य जत्रेतील सर्व दिग्गज कलाकार शिवाजी परब, सुपर्णा शाम, ऋत्विक प्रताप आधी प्रथमच उपस्थित राहणार आहे.
आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या वतीने अचलूर मतदारसंघातील भगिनी व बांधवांसाठी सायंकाळी सहा वाजता अचलपूर मतदारसंघातील गांधी पुलावर सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील हास्य अभिनेते डॉ. निलेश साबळे,भाऊ कदम, शिवाली परम ,पृथ्वीक प्रताप, सुपर्णा शाम उद्या अचलपुर शहरात येत आहे. या कार्यक्रमातील कलाकार आपल्याला उत्कृष्ट अभिनयाने सर्वांना हसवत असतात. या कार्यक्रमांसोबतच महिलांच्या पसंतीत उतरलेल्या होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अचलपूर शहरात प्रथमच होत असलेल्या या महाराष्ट्राची हास्य जत्रा कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
- प्रतिनिधी, रत्नदीप तंतपाळे /चांदूरबाजार