Home » विद्यार्थिनींनी आत्मसंरक्षणाबाबत सजग राहावे -ठाकरे, जिल्हा दामिनी प्रमुख वर्धा

विद्यार्थिनींनी आत्मसंरक्षणाबाबत सजग राहावे -ठाकरे, जिल्हा दामिनी प्रमुख वर्धा

होणाऱ्या अत्याचारापासून संरक्षण करावे-ठाकरे

by Maha News 7
0 comment
Thackeray, District Damini Chief Wardha

वर्धा :- स्थानिक इंदिरा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मध्ये वर्धा जिल्ह्यातील पोलिस विभागाच्या दामिनी पथकाद्वारे गुन्हेगारी संबंधी जनजागृती करण्याच्या निमित्ताने महिला सुरक्षा, सायबर सुरक्षा, रस्ते सुरक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक नरेश येडे यांच्या अध्यक्षतेखाली. याप्रसंगी कार्यक्रमासाठी दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे याला आळा घालण्यासाठी समुपदेशन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला उपस्थितमार्गदर्शक ठाकरे मॅडम (सहा.पोलीस उप निरीक्षक, दामिनी पथक प्रमुख वर्धा ) उपस्थित होत्या. तसेच किरण सुपारे हेड कॉन्स्टेबल वर्धा, अंजली गाडेकर पोलीस कॉन्स्टेबल वर्धा उपस्थित होते.

ठाकरे मॅडम यांनी आत्मसंरक्षण, वाढणारी गुन्हेगारी, मुलींवर होणारे अत्याचार, मोबाईल गुन्हेगारी, दुष्परिणाम, सायबर गुन्हेगारी,यापासून वेळीच मुलींनी सावध राहावे, म्हणजेच विद्यार्थ्यावर वाईट प्रसंग, अत्याचार, गुन्हेगारी प्रवृत्ती रोखता येईल. तसेच रस्ते सुरक्षा याविषयी मार्गदर्शन केले.वर्धा जिल्हा व शांतता प्रस्तावित जिल्हा म्हणून ओळखला जाईल याकरिता आपल्या सर्वांची सहकार्याची गरज आहे व पोलीस विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

तसेच सायबर गुन्हेगारी कशाप्रकारे होतात, फर्जी फोन कॉल यापासून सावध राहण्याचे सूचित केले. नंतर विदयार्थ्यांना प्रश्न विचारण्याची संधी दिली अनेक विद्यार्थ्यांनी वेगवेगळे प्रश्न विचारून समश्यांचे निराकरण केले तर अध्यक्षीय मार्गदर्शनात नरेश येडे यांनी विद्यार्थ्यांना मोबाईल पासून दूर राहून आपले ध्येय व उद्धीष्ट डोळ्यासमोर ठेऊन पुढे वाटचाल करावी असे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम कामडी यांनी केले.

  • प्रतिनिधी, सतीश काळे

ही बातमी पण वाचा : दगडाने ठेचून पानठेला चालकाची निर्घृण हत्या

You may also like