Home » वाघाचा संशयास्पद मृत्यू , परिसरात भीतीचे वातावरण

वाघाचा संशयास्पद मृत्यू , परिसरात भीतीचे वातावरण

'वाघ आला रे' या आरोळीला पूर्णविराम !

by Maha News 7
0 comment
Nagpur Tiger

नागपूर :- आठवडाभरापासून सिहोरा गाव परिसरात मुक्तपणे फिरणारा वाघ मंगळवारी सकाळी तारसा रोडवरील वाघधरे यांच्या धानाच्या शेतात मृतावस्थेत आढळला. वाघाच्या मृत्यूची बातमी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. सुदृढ अवस्थेत असलेला हा वाघ गेल्या आठवडाभरापासून सिहोरा परिसरात वाघाचा मृत्यू कशामुळे झाला ? हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरित आहे. या वाघाने पाच-सहा गायी व वासरांची शिकार केली होती. त्यामुळे गाव व परिसरात भीतीचे वातावरण होते. नागरिक रात्रीच्या वेळी आपल्या घराच्या बाहेर पडत नव्हते. रविवारी रात्री वाघ एमजी. नगरात फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यावेळी नागरिकांनी रात्री एमजी नगरातील रेल्वे ओव्हर ब्रिजवर गर्दी केली होती, पण मंगळवारी हा वाघ शेतात मृतावस्थेत आढळल्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. वाघाच्या आकस्मिक मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल. सध्या तरी आठवड्यापासून परिसरात सुरू असलेल्या ‘वाघ आला रे’ या आरोळीला मात्र पूर्णविराम लागला आहे.

  • ब्युरो रिपोर्ट राकेश मर्जीवे, नागपूर

You may also like