अकोला :- केवळ परीक्षा देण्यासाठी प्रश्नांची उत्तरे देऊन पदविधर झालेले विद्वान यांनी आरक्षण घेऊन नोकरींला लागलेले तथाकथित विद्वान यांनी त्यांच्या पुढच्या पिढीचे आरक्षणाची सीडीचं कापून टाकली आहे. मागासवर्गीय समाजाचे आरक्षण हटवीन्शण्याच्या सोबतच ओबीसी आरक्षणावर हल्ला होत आहे. आरक्षणावर सुप्रीम कोर्टाद्वारे हल्ला करण्यात आला आहे. असे मत विस्तारक पणे ऍड. बाळासाहेब आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी भारतीय बौध्द महासभा द्वारा आयोजित ६८ व्या धम्म चक्र प्रवर्तन दिनी संबोधन करताना व्यक्त केले.
जरांगे पाटील यांनी ओबीसी मधून आरक्षण मागणी केली. मात्र हा ओबीसी समाजावर अन्याय आहे त्यामुळे. आरक्षण वाचवीण्यासाठी ओबीसी समाजाने जागृत होऊन लढा द्यायला तयार असले पाहिजे. ओबीसी चा लढा वंचित बहुजन आघाडी लढते आहे. असेही आवाहन त्यांनी अकोल्यात केले. गेल्या १९८४ पासून बौध्द समाजात आंबेडकरी चळवळी बाबत जागृती करण्यासाठी आणि त्यांच्यात ऊर्जा भरण्यासाठी दरवर्षी अशोका विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी स्थानिक अकोला क्रिकेट क्लब च्या मैदानावर हजारो अनुयायांच्या उपस्थितीत भारतीय बौध्द महासभा अकोला शाखेच्या वतीने धम्म मेळाव्याचे आयोजन केले जात असते. या धम्म मेळाव्यात ऍड. बाळासाहेब आंबेडकर समाजामध्ये जागृती करीत ऊर्जा भरत समाज राजकीय पटलांवर कसा पोहचेल यासाठी आपल्या परिवारासह कष्ट घेत आहेत.
देशातील वंचित बहुजन समाजाला स्वतंत्रपणे, स्वाभिमानी , समृध्द जीवन जगता यावे त्यांना त्यांचे हक्क व न्याय मिळाचा म्हणून श्रध्देय ऍड., बाळासाहेब आंबेडकर यांनी बहुंजन समाजाच्या विकासासाठी त्यांच्या जीवन कौटुबिक तथा वैयक्तिक सुखाचा त्याग करुन जागृतीच विस्तव कधीही विझू देवु नका हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश बौध्द जनतेपर्यंत पोहचवीण्यासाठी अकोला येथे दरवर्षी धम्म मेळाव्याचे आयोजन केले जात असते. अशोका विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी भव्य प्रमाणात अकोला येथे साजरा होत असतो. यामध्ये ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांचे प्रमुख संबोधन असते. या धम्म मेळाव्याचे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभा अकोला जिल्हाध्यक्ष पि जे वानखडे हे हॊते, सूत्रसंचालन नंदकुमार डोंगरे यांनी केले. प्रास्ताविक रमेश गवई (गुरुजी ) यांनी केले. विचार पिठावर प्रा अंजलीताई आंबेडकर, सुजात आंबेडकर, वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य अध्यक्षा रेखाताई ठाकूर, अशोकरावं सोनोने, धैर्यवर्धन पुंडकर, राजेंद्र पातोडे, अरुंधती सीरसाठ, शंकररावं इंगळे, प्रमोद देंडवे, श्रीकांत घोगरे, धीरज इंगळे,जी प सभापती शाहीन परवीन,जी प.अध्यक्षा संगीता अढाव, जी प सदस्यां सौ पुष्पाताई इंगळे, जी प उपाध्यक्ष सुनील फाटकर निलेश विश्वकर्मा,,सौ. शोभाताई शेळके, ऍड. संतोष रहाटे,,प्रा. संतोष हुशे,प्रभाताई सिरसाट, डॉ. प्रसन्नजित गवई,वंदना वासनिक, जी प सदस्य शंकररावं इंगळे,गजानन गवई,मजहर खान, बाबारावं गावंडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावर्षी उत्स्फ़ूर्तपणे लेझीम पथक, आखाडे. देखावे, पारंपारीक वाद्य, घोडे, बॅन्ड पथक, समता सैनिक दलाचे पथसंचालन हे मिरवणुकीचे ख्रास आकर्षण होते.ऍड. बाळासाहेब आंबेडकर सजवलेल्या धम्म रथावर आरुढ होवुन नेतृत्व करीत शहरातून लेझीमपथक, ढोल ताशे, आखाडे यांच्या संगतीने शहरातून मिरवंणुकीने धम्म मेळाव्यात पोहचून उपस्थित समाज बांधव, पक्षाचे कार्यकर्ते यांना संबोधित केले. कार्यक्रम यशस्वीते साठी भारतीय बौध्द महासभा अध्यक्ष पि जे वानखडे, महासचिव नंदकुमार डोंगरे, विजय जाधव, संजय गवई,राहुल गोटे, अशोक नाईक, पराग गवई, आयुष्यमान मेश्राम, आदींनी परिश्रम घेतले.
ही बातमी पण वाचा : आमगाव विधानसभा उमेदवारी वरून समर्थकांत तुफान राडा, कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी