नंदुरबार :- प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत आज नंदुरबार येथे प्रधानमंत्री आवास योजनेचे (Pradhan Mantri Awas Yojana) आदेश वाटप करण्यात आले.जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ सुप्रिया गावित (Dr. Supriya Gavit) यांच्या हस्ते लाभार्थ्यांना आदेश वाटप करण्यात आले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील नागरिकांना हक्काचे घर मिळावे यासाठी प्रधानमंत्री आवास योजना राबवण्यात येत आहे. आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित व भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ हीना गावित यांनी वेळोवेळी ग्रामीण भागातील नागरिकांना हक्काची घरे मिळावी यासाठी प्रयत्न केले आहेत याचाच पाठपुरावाला यश आले असून भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नंदुरबार जिल्ह्यासाठी यामहिन्यात 40 हजार घरकुल मंजूर केले आहेत. यामधून नंदुरबार तालुक्यासाठी दहा हजार घरकुल मंजूर झाले आहेत. 2011 सालच्या जनगणनेनुसार ज्यांच्याकडे घरकुल नाहीत त्यांनाही घरकुल मंजूर करण्यात आली आहेत. राज्याचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉ विजयकुमार गावित यांच्या प्रयत्नाने शबरी घरकुल योजनेअंतर्गत नंदुरबार तालुक्यासाठी 5 हजार घरकुल मंजूर करण्यात आले आहे.एकंदरीत नंदुरबार तालुक्यातील 15 हजार नागरिकांना आता हक्काचे घरकुल मिळणार आहे. या घरकुल आदेशाचे वाटप आज जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ सुप्रिया गावित यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी अधिकारी व ग्रामीण भागातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.