Home » नगरधन येथील गोडाउनमध्ये कार्यरत सुरक्षागार्डचा मृत्यू

नगरधन येथील गोडाउनमध्ये कार्यरत सुरक्षागार्डचा मृत्यू

सिक्युरिटी कंपनीतर्फे योग्य मोबदला देण्याची परिसरातील नागरिकांची मागणी

by Maha News 7
0 comment
Saibaba Solvent Company

नागपूर :- नागपूर जिल्ह्यातील रामटेक-मौदा मार्गावर असलेल्या साईबाबा साल्वेंट कंपनी नगरधन येथील गोडाउनमध्ये काम करणाऱ्या एका सुरक्षा गार्डचा मृतदेह ११ ऑक्टोबरला सकाळी सात वाजताच्या सुमारास कुक्कुट भरलेल्या पोत्याखाली आढळल्याने चर्चेला उधाण आले असून रामटेक जवळील कवडक दुधाळा येथील रहिवासी पिंटू पालेश्वर झाडे वय ४५ वर्ष असे मृतकाचे नाव आहे.

बुधवारी ड्युटीवर गेलेला पिंटू दुसऱ्या दिवशीही घरी परत न आल्याने ११ ऑक्टोबरला घरच्यांनी कंपनीत जाऊन विचारपूस केली असता तो पोत्याखाली दबुन असल्याचे निदर्शनास आले. त्याने ९ ऑक्टोबरला कंपनीत ड्युटी केली. त्याच रात्री १२.३० नंतर ही घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.घटनेची माहिती रामटेक पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेहाचे रामटेक उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. रामटेक पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे. सिक्युरिटी कंपनीतर्फे योग्य मोबदला देण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

You may also like