Home » अकोला शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 5 दोषी बसेसवर कारवाही

अकोला शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 5 दोषी बसेसवर कारवाही

रस्ता सुरक्षा नियम पाळण्याबाबत मोटर वाहन चालकांना समुपदेशन

by Maha News 7
0 comment
Akola Traffic Rule

अकोला : प्रादेशिक परिवहन अधिकारी व उपप्रादेशिक परिवहन अधीकारी अकोला यांच्या आदेशान्वये तथा मार्गदर्शनाखाली रस्ते अपघात रोखण्यासाठी आज दिनांक 8/10/2024 रोजी अकोला शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एकूण 5 दोषी बसेसवर ( अतिरिक्त प्रवासी वाहतूक, विना योग्यता प्रमाणपत्र, विना परवाना, रहदारीस अडथळा निर्माण करून धोकादायक पद्धतीने अवैध ठिकाणी वाहन पार्किंग करणे इत्यादी) मोटर वाहन अधिनियम 1988 अन्वये कार्यवाही करण्यात आली व दोन वाहने अटकावून ठेवण्यात आले व रस्ता सुरक्षा नियम पाळण्याबाबत मोटर वाहन चालकांचे समुपदेशन करण्यात आले तसेच त्यांनी अतिरिक्त प्रवासी भाडे आकारू नये व प्रवासी भाडे बसच्या दर्शनीय भागेस लावण्यास बंधनकारक करण्यात आले. सदर कार्यवाहीमध्ये मोटर वाहन निरीक्षक श्री संदीप तुरकणे, श्री गजानन दराडे व सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक श्री दिव्येश उबाळे, श्री भागवत चोपडे, श्री नितीन खरात प्रादेशिक परिवहन कार्यालय अकोला इत्यादी सहभागी होते.

You may also like