वर्धा : महिला व बाल विकास विभागाच्यावतीने मुख्यमंत्री मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महिला सशक्तिकरण योजना व महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा लाभ महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत दि.13 ऑक्टोबर रोजी महिला मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचे उद्घाटन वन,सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Munganttiwar) यांच्या हस्ते होणार आहे. मेळाव्यास मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कार्यक्रम अधिकारी (बाल कल्याण) मनिषा कुळसंगे यांनी केले आहे.दि.13 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता स्वावलंबी मैदानावर आयोजित महिला मार्गदर्शन मेळाव्याला खा. अमर काळे, आ. अभिजित वंजारी, आ. सुधाकर अडबाले, आ. रणजित कांबळे, आ.दादाराव केचे, आ. समीर कुणावार, आ. डॉ. पंकज भोयर यांची मुख्य अतिथी म्हणुन उपस्थिती राहणार असुन तर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रमेश दडमल, बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) किर्तीकुमार कटरे यांनी कळविले आहे.
वर्द्यात भव्य महिला मेळाव्याचे आयोजन, पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन
previous post