Home » करटी खुर्द ग्रामवासियांचा ग्रामविकास अधिकारी यांना घेरावं

करटी खुर्द ग्रामवासियांचा ग्रामविकास अधिकारी यांना घेरावं

पाणी पुरवठा योजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी मनुष्यबाळाची निवड प्रकरण

by Maha News 7
0 comment
Karti Khurd villager

गोंदिया : महाराष्ट्र शासनाने जल जीवन मिशन जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन योजना राबविण्याचा संकल्प केला त्यामध्ये नल जल मित्र कार्यक्रमांतर्गत नळ पाणी पुरवठा योजनाच्या देखभाल दुरुस्तीसाठी ग्रामपंचायत निहाय एक ट्रेड ग्रुप निहाय तीन मनुष्यबाळांची निवड करून नामनिर्देश जिल्हास्तरावर पाठवीन्याचे आदेश गटविकास अधिकारी यांना दिले होते….आणि गट विकास अधिकारी यांनी तालुक्यातील संपूर्ण ग्रामपंचायत यांना यादी निवड करून पाठवण्याचे आदेश ग्राम विकास अधिकारी यांना दिले…परंतु गोंदिया जिल्यातील तिरोडा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत करटी येथे ज्या पद्धतीने जल मित्राची निवड करायची होती त्या पद्धतीने ग्रामविकास अधिकारी यांनी केली नाही असा आरोप सर्व ग्रावासियांनी केला आहे मिळालेल्या माहितीनुसार ग्रामविकास अधिकारी यांनी आपल्या मनमर्जीने सरपंच यांना न विचारता तीन जल मित्राची निवड केली आहे परंतु गावातील लोकांच्या सांगण्या नुसार ग्रामसेवक यांनी ग्रामपंचायत पदाधिकारी व लोकांना विश्वासात न घेता यादी कुणाच्या सांगण्या नुसार तयार केली असा आरोप ग्रामविकास अधिकारी यांच्यावर केला परंतु कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टी्कोनातून सरपंच उपसरपंच व इतर ग्रामपंचायत चे पदाधिकारी यांच्या विनंती ने त्वरित सभा घेऊन पुन्हा नवीन लाभार्थ्यांची यादी तयार करून गटविकास अधिकारी यांना पाठवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे गावात शांततेचे वातावरण निर्माण झाले…

 

You may also like