यवतमाळ : यवतमाळ शहरापासून दक्षिणेला गोदनी मार्गावरून पुढे गेल्यास निसर्ग सौंदर्याने नटलेल्या परिसरात आई वाघाई चे मंदिर आहे. उजाड झालेल्या निळोणा गावातील वाघाई अनेक परिवारांची कुलस्वामिनी असून. भक्तांची वाघाई वर अतूट श्रद्धा आहे. त्यामुळंच नवरात्री उत्सवात वाघामायचा जागर होत असून. इथं नेहमीच भाविकांची ओढ असते. यवतमाळ शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या निळोना धरणाच्या काठी, ज्या वाघाडी नदीवर हे धरण साकारले तिच्या शेजारी, आणि उंच डोंगराच्या पायथ्याशी असलेली वाघामाय यवतमाळ वासीय भक्तांचे श्रद्धास्थान आहे. गोदनी ते बरबडा गावाच्या मधे सुमारे ४०० वर्षापूर्वीपासून वाघाईचे मंदिर आहे, देवीची सुंदर मूर्ती स्वयंभू आहे. अडीच फुट उंच असलेली आई ची मूर्ती लोभस असून तिला नित्यरोज साज श्रुंगार केला जातो. यवतमाळ पासून ७ किमी अंतरावर पूर्वी येथे निळोना हे गाव होते. ग्रामस्थांचे ग्रामदैवत असलेल्या वाघाई वर बरबडा, चौधरा, खरुला, गोदनी सह यवतमाळ शहर व नजीकच्या भक्तांची प्रचंड श्रद्धा आहे. पूर्वी हे मंदिर टेकडीवर कपार्यांमध्ये होते मात्र भक्ताच्या तपश्चर्ये नंतर आई पायथ्याशी आली अशी मान्यता आहे. पूर्वी येथे छोटेसे मंदिर होते मात्र वाघामाय वर श्रद्धा असणाऱ्या भक्तजनांनी ५० फुट उंचीचे कळस असलेल्या मंदिराचे बांधकाम केले असून त्याच्या सजावटीचे कार्य सुरु आहे. ५० वर्षापूर्वी यवतमाळकरांच्या तृष्णातृप्तीसाठी निळोणा ची जमीन अधिग्रहित करून तेथे धरणाचे निर्माण झाले. गाव स्थलांतरीत झाले मात्र वाघाईचे तेथेच वास्तव्य आहे. देवीच्या नावाने यवतमाळ तालुक्यातील एकमेव वाघाडी नदी देखील या मंदिराजवळून वाहते.
ही बातमी पण वाचा : शहर के सुप्रसिद्ध महालक्ष्मी जगदंबा देवस्थान में भक्तों की भीड़
वाघाई ची मूर्ती अतिशय जागृत असल्याची भावना आहे. वाघामाय च्या गाभार्या समोरच तिचे वाहन असलेल्या वाघांच्या मुर्त्या देखील आहेत. पूर्वीच्या काळात यवतमाळ वरून पाय वाटेने निळोना पर्यंत येता येत होते मात्र पुढे वाघाडी नदी असल्याने बरबडा चौधरा साठी कठीण मार्ग होता. घनदाट वृक्षांनी परिसर व्यापला होता त्यातच डोंगर कपाऱ्या आल्याने वाघांचे येथे वास्तव्य होते. तरीही भक्त वाघामाय च्या दर्शनाला यायचे अनेकांना वाघ आडवा आला मात्र त्याने कुणालाही ईजा पोहोचविली नाही. हि वाघामाय चीच कृपा असे माणून भक्त येथे वाघाच्या प्रतिमा अर्पण करतात. मंदिरात नेहमीच आईचा जागर, व भंडारा आयोजित होत असतो. चैत्र व अश्विन नवरात्रीला मंदिरात उत्सव असतो. वाघाई अनेकांचे कुलदैवत असल्याने भक्तांची नेहमीच येथे रेलचेल असते. निसर्गरम्य परिसर, गर्द हिरवळ असलेली वृक्षवल्ली, निळोना धरण यामुळे भरभरून निसर्गसौंदर्य लाभल्यानेही वाघाई मंदिरात मन रमतं. भक्तांच्या सहकार्यातून वाघामाय चे भव्य मंदिर साकारल्या जात आहे, नुकतेच सभागृहाचे काम पूर्ण झाले असून परिसरात सुंदर बगिचा आणि पर्यटकांसाठी सोयी सुविधा निर्माण करण्याचा विश्वस्थांचा मानस आहे.
हा परिसर पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित असला तरी येथे कुठलेही विकास कार्य शासनाने हाती घेतलेले नाहि. निळोणा नदी व धरण तसेच त्यासाठी अधिग्रहित जमिनीवर निसर्ग पर्यटन केंद्र सकारावे, अशी विश्वस्थांची मागणी आहे.
महा न्यूज ७ सैयद मतीन,यवतमाल शहर