वर्धा:-वर्धा विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अनुषंगाने 47 विधानसभा मतदार संघ अंतर्गत 85 वर्षा वरील व 40 टक्केपेक्षा जास्त दिव्यांग मतदारांकरीता वर्धा विधानसभा मतदारसंघात गृह मतदान आज सुरुवात झाली आहे. 92 वर्षीय सुशीलाबाई शंकर गायकवाड यांनी आपला गृह मतदानाचा हक्क बजावला.
गृह मतदानाचे वेळी निवडणूक निरीक्षक (सामान्य) व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन टपाली मतदान प्रक्रियेची पाहणी केली.
आज दिनांक 8 नोव्हेंबर 2024 रोजी वर्धा विधानसभा मतदार संघातील गृहभेट टपाली मतदानाचे वेळी विनय बुबलानी, निवडणूक निरीक्षक (सामान्य) यांनी श्रीमती सुशीलाबाई शंकर गायकवाड वय वर्ष 92, जुनी वस्ती पिपरी मेघे, वर्धा यांचे घरी भेट देऊन टपाली मतदान प्रक्रियेची पाहणी केली आहे.
गृह मतदाना करीता वर्धा विधानसभा क्षेत्रात 85 वर्षावरील 341 मतदार यात पुरुष मतदार संख्या 210 तर स्त्री मतदार संख्या 131 आहेत. तर 40 टक्केपेक्षा जास्त दिव्यांग असलेले 75 मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदार संख्या 28 व स्त्री मतदार संख्या 47 आहेत.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कार्डीले यांनी 85 वर्षावरील श्रीमती शारदाबाई कृष्णराव दांडोडकर, तुकाराम वार्ड, रामनगर, वर्धा यांचे घरी भेट देऊन टपाली मतदान प्रक्रियेची पाहणी केली आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने वर्धा विधानसभा मतदार संघात दिनांक 8, 9 व 10 नोव्हेंबर 2024 रोजी 85 वर्षावरील व 40 टक्केपेक्षा जास्त दिव्यांग असलेल्या मतदारांकरीता गृह मतदानाची सुविधा उपलब्ध केली आहे. वर्धा विधानसभा मतदार संघात गृह मतदाना करीता मतदार यादीनुसार 238 स्त्री मतदार व 178 पुरुष मतदार असे एकूण 416 मतदार आहेत.
गृह मतदान घेण्याकरीता वर्धा विधानसभा मतदारसंघात 14 मतदान पथक तयार करण्यात आले असून 2 राखीव पथक नेमलेले आहेत. या पथकामध्ये मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, मायक्रो ऑब्जरवर, 1 पोलीस कर्मचारी व 1 व्हीडीओ ग्रॉफर यांची नेमूणक करण्यात आली आहे.
गृहभेट टपाली मतदान प्रक्रिया दि, 8 व 9 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5.00 या वेळेत राबावयाची आहे. जे मतदार या दोन दिवशी गैरहजर राहतील त्यांचेकरीता दि. 10 नोव्हेंबर 2024 हा गृह भेट टपाली मतदानासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे. 8 नोव्हेंबर 2024 रोजी 233 मतदारांचे गृह मतदान होणार असून दि. 9 नोव्हेंबर 2024 रोजी 183 मतदारांचे गृह मतदान घेण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी दिपक कारंडे तसेच सहाय्यक निवडणूक अधिकारी संदीप पुंडेकर व मलिक विराणी हे उपस्थित होते.
मतदार संघातील गृहभेट टपाली मतदानाचे वेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी संदीप पुंडेकर हे उपस्थित होते असे निवडणूक निर्णय अधिकारी दिपक कारंडे यांनी कळविले आहे.
प्रतिनिधी
- सतीश काळे वर्ध