Home » Gondia : देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते 5217 कोटी रुपयांचे भूमिपूजन

Gondia : देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते 5217 कोटी रुपयांचे भूमिपूजन

शेतकऱ्यांसाठी धानाच्या बोनस साठी २५ हजार रुपये देण्याची घोषणा

by Maha News 7
0 comment
Devendra Fadnavis

गोंदिया :- गोंदिया जिल्ह्यातील धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा 2 अंतर्गत मुख्य पम्पगृह कवलेवाडा ते बोदलकसा, चोरखामारा तलावत पाईपलाईन द्वारे पाणी सोडण्याच्या कामाचे उदघाटन व जलपूजन देवेद्र फडवणीस (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते पार पडले. तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार विजय रहांगडाले यांच्या अथंग प्रयत्नाने क्षेत्रातील शेतकरांच्या शेतीतील उत्पन्न वाढण्याच्या दृष्ठिने जलसंपदा मंत्री यांच्या निधीतून तब्बल 5217 कोटी तर तिरोडा नगरपरिषद येथील मलनिस्सारन भूमिगत गटार योजना भूमिपूजन व गोरेगावं नगरपंचात गोरेगाव वाढीव पाणीपुरवठा योजच्या विकासासाठी 205 कोटी रुपयांची निधी मंजूर करून सर्व सामान्य जनतेच्या विकासासाठी आमदार विजय रहांगडाले यांनी पाऊल उचलले.. विजय रहांगडाले यांच्या प्रयत्नांना पाहून उपमुख्यमंत्री देवेद्र फडवणीस यांनी अभिनंदन केले..उपमुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांसाठी रुपये वीस हजार धानाच्या बोनस ऐवजी पंचवीस हजार रुपये देण्याची घोषणा सुद्धा केली .यावेळी चंद्रसशेखर बावनकुळे, परिणय फुके, राजेंद्र जैन, पंकज रहांगडाले प्रामुख्याने उपस्थित होते.

  • रिपोर्टर : भूपेंद्र रंगारी तिरोडा गोंदिया

You may also like