नागपुर :- विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धडक कारवाईत नागपूर येथून तब्बल 37 लाख 71 हजार 200 रुपयांचा विदेशी स्कॉच मद्याचा साठा जप्त करण्यात आला. गुप्त माहिती मिळाल्यानंतर उत्पादन शुल्क विभागाने तत्काळ ही कारवाई केली. नागपूर पोलीस स्टेशन सिताबर्डीच्या हद्दीत धरमपेठ मुलीच्या शाळेजवळ निलय अशोक गडेकर याच्या राहत्या घरासमोर असलेल्या वाहनामधून हा साठा जप्त करण्यात आला.